एन.ई.एफ.टी. [ नॅशनल इलेक्ट्रॉनिक्स फंड ट्रान्सफर ]
शालिवाहन पतसंस्था NEFT सुविधा प्रदान करते जी अत्यंत किफायतशीर आहे आणि सुरक्षित प्लॅटफॉर्म वर तयार केलेली आहे.
पैसे हस्तांतरासाठी धनादेश किंवा धनाकर्ष (DD) वापरण्याची गरज नाही.
पैसे हस्तांतरित करण्यासाठी तुम्हाला बँकेत जाण्याची आवश्यकता नाही.
वैयक्तिक किंवा व्यावसायिक व्यवहारासाठी सुरक्षित निधी हस्तांतरण
या प्रणालीमुळे ऑनलाइन निधी हस्तांतर करणे अधिक सुलभ
आर.टी.जी.एस. [रिअलटाइमग्रॉससेटलमेंट ]
एनईएफटीच्या तुलनेत आरटीजीएसद्वारे पैसे हस्तांतरित करणे अत्यंत जलद आहे.
तुमच्या खात्यातून लाभार्थीच्या खात्यात निधि हस्तांतरण फक्त ३० मिनिटात.
दोन लाख रुपये आणि त्याहून अधिक मूल्याच्या व्यवहारासाठी ही प्रणाली वापरता येते.
प्रगत आणि डिजिटल तंत्रज्ञानासह या सुविधेचा आनंद घ्या
मोबाइल बँकिंग
गूगल प्ले स्टोर वरुन ‘शालिवाहन मोबाइल बँकिंग’ अॅप्लिकेशन डाऊनलोड करा आणि तुमच्या स्मार्ट फोन वरुन कुठेही केव्हाही ठेव, RTGS, NEFT, खाते तपासणी, स्टेटमेंट डाऊनलोड चा आनंद घ्या.
बीबीपीस बिल भरणा
शालिवाहन पतसंस्थेने आपल्या सर्व शाखांमध्ये बीबीपीएस अंतर्गत सर्व बिल भरणा सुविधेसाठी स्वतंत्र डेस्क उपलब्ध करून दिले आहे. जेथे विनासायास वीजबिल व इतर बिल घरबसल्या भरता येते आणि वेळेची बचतही होते.
एस.एम.एस बँकिंग
आता एस.एम.एस बँकिंग द्वारे तुमच्या शालिवाहन पतसंस्थेच्या खात्याशी कनेक्ट रहा…..
या सेवेद्वारे तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवर तुमच्या खात्याशी संबंधित डेबिट आणि क्रेडिट सारख्या नविनतम व्यवहारांबद्दल माहिती देणारा एसएमएस प्राप्त होईल.
एसएमएस बँकिंग ही शालिवाहन पतसंस्थेने विशेष सेवा देवू केली आहे, जी ग्राहकांना त्यांच्या मोबाइल फोनद्वारे कधीही 24/7 सुविधेद्वारे त्यांच्या खात्यांमध्ये प्रवेश व व्यवस्थापित करण्याची परवानगी देते.
QR कोड
शालिवाहन QR कोड द्वारे तुमचे व्यवसाय श्रेणी सुधारित करा….
तुमचा व्यवसाय पुर्णपणे डिजिटल करण्यासाठी तुम्ही QR कोड वापरण्याचा विचार करत आहात का ?
तुमच्या व्यवसायला गती देण्यासाठी तुम्ही आता शालिवाहन QR CODE च्या माध्यमातून कॅशलेस होऊ शकता. बदलत्या काळानुसार आता QR CODE सह पेमेंट करणे आणि प्राप्त करणे आता सोपे झाले आहे.
तर तुम्ही कशाची वाट पाहत आहात ?
शालिवाहन पतसंस्थेचे भागीदार व्हा आणि तुमच्या व्यवसायला गती द्या !