श्री.किशोर चौहान

अध्यक्ष

शालिवाहन नागरी सहकारी पतसंस्था मर्या. पैठण

संचालक

महाराष्ट्र स्टेट क्रेडिट को. ऑप. सोसायटीज डेव्हलपमेंट व वेलफेअर असो. लि. पुणे

सदस्य

महाराष्ट्र प्रदेश सहकार भारती

माननीय

अध्यक्ष महोदयांचे मनोगत ....

मी स्वतःला सर्वांसाठी उपयुक्त बनण्यासाठी वाचनबद्ध आहे……!

“ सभासद व ग्राहकांचा विश्वास हेच आमचे खरे भांडवल “

सप्रेम नमस्कार !

“सभासद व ग्राहकांचा विश्वास हेच आमचे खरे भांडवल ”

          कल्पकता, सचोटी, प्रामाणिकपणा, शिस्तप्रिय कारभार आणि फक्त अन फक्त सभासद व ग्राहकांचे हित या आधारे आपली “शालिवाहन ” आज महाराष्ट्रातील पतसंस्थांसाठी एक  “ रोल मॉडेल ठरली आहे याचा मनस्वी आनंद होत आहे . अडचनींच्या प्रसंगी सभासदांना आर्थिक आधार देतानाच विविध लाभदायी योजनांद्वारे ग्राहकांचे हित जपण्याचे कार्य देखील संस्था नेटाने करत आहे .

१९९७ साली लावलेल एक छोटसे रोपट आज एक भव्य असे वटवृक्ष बनले आहे. बदलत्या युगाबारोबरच डिजिटल तंत्रज्ञानाचा अंगीकार करून आपली संस्था अत्याधुनिक सेवा-सुविधा प्रदान करण्यात संपूर्ण महाराष्ट्रात अग्रेसर आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो. सहकार भारतीच्या तत्त्वावर वाटचाल करत सातत्याने सर्वोत्तम कामगिरी बजावुन महाराष्ट्रभर मुख्य कार्यालय (पैठण) १३ शाखांचा विस्तार करतांना संस्थेने २५० कोटी व्यवसायाचे लक्ष्य साध्य केले आहे.

दर्जेदार बँकिंग सेवा प्रदान करण्याबरोबरच शालिवाहन कडून विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले जातात .रक्तदान व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर, मोफत वैदयकीय तपासणी, रूग्णवाहिका, दिव्यांगासाठी जयपूर फुट, रुग्णवाहिका, वृक्षारोपण व संगोपन अशा विभिन्न सेवा ग्राहक तसेच सभासदांची आरोग्य तपासणी व सामान्य नागरिकांच्या आरोग्य संवर्धंनासाठी निष्ठापूर्वक प्रयत्न केले जातात.  संस्थेबरोबर असलेले आपले विश्वासाचे बंध अधिक बळकट होऊ देत, अशी मी आशा करतो. आपल्या सदिच्छा नेहमी आमच्या सोबत आहेत व वृद्धिंगत होतील याची माला खात्री आहे !

शालिवाहन एक गौरवास्पद वाटचाल !

महाराष्ट्र राज्य कार्यक्षेत्र
सुबक वास्तुशैलीने नटलेले वातानुकूलित प्रशस्त कार्यालय व संस्थेच्या सर्व शाखा
कोअर बँकिंग प्रणालीसह सर्व शाखांमध्ये संपूर्णपणे संगनिकृत कामकाज
सातत्याने नफ्यात वाढ तसेच सभासदांना १२% लाभांश
भक्कम सुरक्षा – दरवर्षी सुरक्षा ऑडिट
सर्व शाखांमध्ये नामांकित कंपनीचे फायरवॉल व एन्ंटीव्ह्ययरस
शिस्तप्रिय व कल्पक नेतृत्व आणि सोबत संस्थेच्या प्रगतीसाठी तत्पर
संचालक मंडळ
ग्राहकांना निस्वार्थी सेवा देणारे संस्थेचे सर्व वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी
अभिमान वाटावा असे काही
पुरस्कार सन्मान
०५ वर्षा पासून अवीज पब्लिकेशन द्वारा " बँको ब्ल्यु रीबन " पुरस्काराने सन्मानित
सहकार सुगंध द्वारा " प्रतिबिंब अहवाल " पुरस्कार
२०२२ - २३ दिव्य मराठीचे वतीने संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष किशोरजी चौहान - " बेस्ट चेअरमन " पुरस्काराने सन्मानित.
२०२३ - लोकसत्ता संघर्ष तर्फे संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मण गायके - " BEST CEO “ पुरस्काराने सन्मानित .
२०२२ - पैठण तालुका व्यापारी महासंघातर्फे |" व्यापारी अग्रणी पुरस्कार – २०२२" ने सन्मानित .
२०१७,२०१८,२०१९,२०२२व२०२४- म.राज्य सहकारी फेडरेशन च्या वतीने दिल्या जाणार्‍या "दीपस्थंभ" पुरस्काराने सन्मानित
२०२४- १०० कोटी व त्यापुढील ठेवी असणार्‍या पथसंस्थांमध्ये "शालिवाहन ची प्रथम क्रमांकाच्या "दीपस्थंभ" पुरस्कारासाठी निवड
English Language