







श्री.किशोर चौहान

अध्यक्ष
शालिवाहन नागरी सहकारी पतसंस्था मर्या. पैठण

संचालक
महाराष्ट्र स्टेट क्रेडिट को. ऑप. सोसायटीज डेव्हलपमेंट व वेलफेअर असो. लि. पुणे

सदस्य
महाराष्ट्र प्रदेश सहकार भारती
अध्यक्ष महोदयांचे मनोगत ....
मी स्वतःला सर्वांसाठी उपयुक्त बनण्यासाठी वाचनबद्ध आहे……!
“ सभासद व ग्राहकांचा विश्वास हेच आमचे खरे भांडवल “
सप्रेम नमस्कार !
“सभासद व ग्राहकांचा विश्वास हेच आमचे खरे भांडवल ”
कल्पकता, सचोटी, प्रामाणिकपणा, शिस्तप्रिय कारभार आणि फक्त अन फक्त सभासद व ग्राहकांचे हित या आधारे आपली “शालिवाहन ” आज महाराष्ट्रातील पतसंस्थांसाठी एक “ रोल मॉडेल ” ठरली आहे याचा मनस्वी आनंद होत आहे . अडचनींच्या प्रसंगी सभासदांना आर्थिक आधार देतानाच विविध लाभदायी योजनांद्वारे ग्राहकांचे हित जपण्याचे कार्य देखील संस्था नेटाने करत आहे .
१९९७ साली लावलेल एक छोटसे रोपट आज एक भव्य असे वटवृक्ष बनले आहे. बदलत्या युगाबारोबरच डिजिटल तंत्रज्ञानाचा अंगीकार करून आपली संस्था अत्याधुनिक सेवा-सुविधा प्रदान करण्यात संपूर्ण महाराष्ट्रात अग्रेसर आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो. सहकार भारतीच्या तत्त्वावर वाटचाल करत सातत्याने सर्वोत्तम कामगिरी बजावुन महाराष्ट्रभर मुख्य कार्यालय (पैठण) १३ शाखांचा विस्तार करतांना संस्थेने २५० कोटी व्यवसायाचे लक्ष्य साध्य केले आहे.
दर्जेदार बँकिंग सेवा प्रदान करण्याबरोबरच शालिवाहन कडून विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले जातात .रक्तदान व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर, मोफत वैदयकीय तपासणी, रूग्णवाहिका, दिव्यांगासाठी जयपूर फुट, रुग्णवाहिका, वृक्षारोपण व संगोपन अशा विभिन्न सेवा ग्राहक तसेच सभासदांची आरोग्य तपासणी व सामान्य नागरिकांच्या आरोग्य संवर्धंनासाठी निष्ठापूर्वक प्रयत्न केले जातात. संस्थेबरोबर असलेले आपले विश्वासाचे बंध अधिक बळकट होऊ देत, अशी मी आशा करतो. आपल्या सदिच्छा नेहमी आमच्या सोबत आहेत व वृद्धिंगत होतील याची माला खात्री आहे !