
आमच्याबद्दल ………….
!! उत्तरो हिमवंतो राया ! दक्षिणो सलाहना !!
!! समभार भरक्रांता ! तेण पल्हहा सहनपूर्वी !!
(पूर्वेला सूर्य आहे, पश्चिमेला चंद्र, उत्तरेला हिमालय आणि दक्षिणेला सातवाहन राजकुल म्हणून ही पृथ्वी समभार आहे.)
विश्वास २७ वर्षांचं !
पैठण तालुक्यातील सर्व लहान व्यापारी, दुर्बल घटकातील लोकांना आर्थिक सहाय्य करण्याच्या उद्देशाने पैठण [ प्रतिष्ठान नागरी ], जिल्हा- छत्रपती संभाजीनगर येथे जूलै १९९७ रोजी शालिवाहन पतसंस्थेची स्थापना करण्यात आली. आमच्या सन्माननीय ग्राहकांसोबत मजबूत व घट्ट संबंध व सोबत योग्य आर्थिक उपाय प्रदाता बनने व मार्गदर्शन करणे हे आमचे ब्रीद होय.
संस्थेचे चेअरमन श्री. किशोर चौहन आणि सर्व संचालक मंडळ यांचे मार्गदर्शनाखाली आम्ही सहकार भारती च्या [ विना संस्कार नाही सहकार … विना सहकार नाही उद्धार ] तत्वावर वाटचाल करत पैठण येथे मुख्य कार्यालय सोबत महाराष्ट्रभर १३ शाखांचा विस्तार करत संस्थेने २५० कोटी एकूण व्यवसायचे उद्दीष्ट साध्य केले आहे.
दर्जेदार बँकिंग सेवा देण्याबरोबरच आम्ही रक्तदान शिबीर, मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर, दिव्यांग बांधवांना कृत्रिम हात पाय [ जयपुर फुट ] वितरण, रुग्णवाहिका सेवा, स्वर्गरथ सेवा, वृक्षारोपण आणि संगोपन मोफत वैद्यकीय तपासणी या सारख्या विविध समाजोपयोगी सेवा प्रदान करण्यात आम्ही महाराष्ट्रात अग्रेसर आहोत.

शालिवाहन ………………… एक दृष्टिक्षेप इतिहासाकडे
ऐतिहासिक काळात “ प्रतिष्ठाण ” या नावाने ओळखले जाणारे सातवाहन राजवंशाचे आणि गौतमीपुत्र शालिवाहन राजाचे राजधानीचे ठिकाण असणारे , इतिहास व संस्कृतीच्या पाऊलखुणा जतन करणारे , श्री संत एकनाथ महाराजांच्या पावन समाधीने पुनीत झालेले दक्षिण काशी म्हणून स्थान असणारे आपले “ पैठण ” शहर होय .
शालिवाहन हा एक शूर व पराक्रमी राजा होऊन गेला. बालपणी तो एक वृद्ध कुंभाराच्या संपर्कात आला व त्याने तेथेच सुंदर-सुंदर मातीच्या मूर्ति घडविण्याची कला अवगत केली. शतकर्णी ( शालिवाहन ) आपल्या सवंगड्यांसोबत खेळतांना अनेक मातीचे हत्ती ,घोडे ,सैन्य, शस्त्र अशी खेळणी स्वत: तयार करून खेळत असे. जणू काही शालिवाहन राजाला भविष्यातील येणार्या संकटाची चाहूल लागली असावी आणि घडलेही असेच.
अशी एक अख्यायिका आहे की, राजा विक्रमादित्याने प्रतिष्ठाण (पैठण) नगरीवर आक्रमण केले असता शालिवाहनाने कुंभारवाडयातील तयार करून ठेवलेल्या हजारो बालपणींच्या खेळण्यांवर अभिमंत्रित जल शिंपडताच कोटींच्या संख्येमध्ये शस्त्रधारी सैन्य व इतर प्राणी जीवंत होऊन विक्रमादित्या विरुद्ध लढले. विक्रमादित्याचा दारुण पराभव करत त्याला ठार मारले व पुढे अनेक वर्षे उज्जैनवर राज्य केले . तो ४०० वर्षाचा सुवर्णकाळ हा अत्यंत वैभवशाली वा समृद्ध काल होता. शालिवाहनाने आपल्या जीवन काळात अनेक अत्याचारी शकांचा व यवनांचा पराभव केला आणि आपल्या विजयोत्सवाच्या रुपाने नवीन युगाचा म्हणजे शालिवाहन शकाचा प्रारंभ ई.स. पूर्व ७८ मध्ये केला . तेव्हापासूनच “ शालिवाहन शक ” ही कालगणनेची लोकप्रिय व प्रचलित पद्धत महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, आंध्रप्रदेश (द.भारत) मध्ये अस्तित्वात आली. हिंदू कॅलेंडर, हिंदू पंचांग, भारतीय राष्ट्रीय कॅलेंडर आणि कम्बोडिया बौद्ध कॅलेंडरमध्ये आज देखील शालिवाहन शकाचा प्रयोग केला जातो .
आज आपण शालिवाहन शके १९४६ मध्ये वावरत असतांना शालिवाहन प्रतिष्ठाण (पैठण) नगरीच्या पावन भूमीत शालिवाहनाच्या नावाने “शालिवाहन नागरी सहकारी पतसंस्था” उदयास आली व आज २८ व्या वर्षात पदार्पण करत महाराष्ट्रभर उंच उंच गरुडझेप घेतली आहे याचा संस्थेचे संचालक मंडळ, सभासद, ठेवीदार ,हितचिंतक यांना सार्थ अभिमान वाटतो
गुंतवणुकीसाठी शालिवाहन पतसंस्था ही सर्वोत्तम का आहे ?

महाराष्ट्र राज्य कार्यक्षेत्र मुख्य कार्यालय (पैठण) +13 शाखांचे भव्य जाळे व नियोजित 4 शाखा.


27+ वर्षापासून पतसंस्थेच्या माध्यमातून विश्वसनीय व अविरत सेवा.


सातत्याने 98% कर्ज वसुली व नियमित ऑडीट वर्ग 'अ' (NPA Below 1%)


31223+ आनंदी व समाधानी ग्राहक

7566+ सभासदांचा समाधानी व विशाल परिवार


सातत्याने 12% लाभांश


ISO 9001-2015 मानांकन असलेली राज्यातील प्रथम पतसंस्था.


150+ प्रशिक्षीत व विनयशील कर्मचारी सदैव आपल्या सेवेत तत्पर