दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या पैठण नगरीत  “शालिवाहन” नावाने एक छोटेसे बीज रोवले गेले. सुरवातीचा काल खडतर होता, पण  येणार्‍या प्रत्येकाला जिव्हाळ्याने, आपुलकीने जपण आणि उत्तम सेवा देणे हे आद्य कर्तव्य समजून छोट्याश्या कार्यालयापासून शालिवाहन चा प्रवास सुरू झाला. १९९७ साली संचालक मंडळाने लावलेल्या  छोट्याशा रोपट्या पासून झालेली ही सुरवात आज ग्राहकांच्या सहकार्य, विश्वास आणि थोरा मोठयाच्या आशिर्वादामुळे भव्य वटवृक्षात रूपांतरित झाली आहे. याआधारे शालिवाहन पतसंस्था आज महाराष्ट्रतील पतसंस्थासाठी एक “रोल- मॉडेल” ठरली आहे. 

महाराष्ट्रात सर्वप्रथम ISO 9001:2015 मानांकन मिळवून तसेच बदलत्या युगाबरोबरच डिजिटल तंत्रज्ञानाचा अवलंब करून ग्राहकांना Core Banking, RTGS/NEFT/IMPS, SMS Banking, ABB Banking, Nach/ECS, QR Code, Mobile Banking यासारख्या प्रगत व अत्याधुनिक सेवा-सुविधा प्रदान करण्यात शालिवाहन पतसंस्था अग्रेसर आहे. आधुनिक तंत्रज्ञान म्हणजे निरंतर प्रगतीचे साधन समजून काळानुरूप कार्यपद्धतीत बदल करत सोसायटीने नेहमीच ग्राहक सेवेचे नव-नवीन मानदंड प्रस्थापित केले आहेत.

सेवा, सुविधा व विश्वासाच्या बळावर आज संस्थेचे 35,000 पेक्षा जास्त  आनंदी व समाधानी ग्राहक आहेत आणि दर दिवशी हा आकडा वाढतो आहे. ग्राहकांच्या याच प्रेम व विश्वासामुळे आम्ही महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात मुख्य कार्यालयसह १३ शाखा विस्तारित करू शकलो आणि भविष्यात अजूनही शाखा वाढीचा मानस आहे.

 बँकिंग क्षेत्रातील सर्वोत्तम कामगिरी बरोबरच समाजपयोगी सेवा जसे अल्प दरात रुग्णवाहिका व स्वर्गरथ सेवा, जयपूर फूट शिबीर अंतर्गत २५०० दिव्यांग रुग्णांना कुत्रीम अवयवाचे वाटप, दरवर्षी रक्तदान शिबीर, सुमारे १,५०,००० रुग्णांची मोफत नेत्र तपासणी व १०००० रुग्णांची यशस्वी मोतीबिंदू क्षस्त्रक्रिया, मोफत आरोग्य तपासणी, सुमारे २५०० वृक्षांची लागवड व यशस्वी संगोपन, दरवर्षी संत एकनाथ षष्ठीनिमित्त वारकर्‍यांना प्रसाद वाटप, गोदावरी स्वच्छता अभियान, शालेय साहित्य खरेदीकरिता आर्थिक सहाय्य, निराधार, अनाथ व मुकबधिर विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, योग शिबिराचे आयोजन, गोशाळेला चारा खरेदीकरिता आर्थिक सहाय्य, कोविड काळात मुख्यमंत्री सहाय्यता निधिसाठी ५ लाखाची मदत व सभासदांना Mask व Sanitizer व औषधांचे वाटप यासारखे अनेक समाजोपयोगी करी संस्थेमार्फत अविरत सुरू आहे. या पुढेही ही पतसंस्था समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील राहील.”

शाखा- पैठण

शाखा- पाचोड

शाखा-चितेगाव

शाखा-गारखेडा

शाखा-वाळूज

शाखा-गंगापूर

शाखा-वैजापूर

शाखा-पाथर्डी

शाखा- शेवगाव

शाखा-अंबड

शाखा-कन्नड

शाखा-सिल्लोड

शाखा-येवला

English Language