





विविध ठेव योजना
ठेवीदारांनी ठेवी ठेवतेवेळेस घ्यावयाची काळजी
सहकार आयुक्त व निबंधक, पुणे (नियामक मंडळ) यांचे परिपत्रक क्र. २९०२ दि. २६/०७/२०२३ नुसार पतसंस्थांमधील ठेविंचा व्याजदर १०% पर्यंतच असावा. परंतु काही पतसंस्था व मल्टीस्टेट १५% पर्यंत व्याजाचे आमिष दाखवून ठेवीदारांना आकर्षित करतात. अवास्तव व अव्यवहार्य योजनांमुळे पतसंस्था व मल्टीस्टेट चा व्यवहार कोलमडतो व परिणामी ठेवी परत मिळणे दुरापास्त होऊन ठेवीदार व त्यांचे कुटुंब उद्ध्वस्त होते.
आपल्या ठेवी सुरक्षित राहण्यासाठी ठेवीदारांनी ठेवी ठेवतांना अवास्तव व्याजदराच्या अमिषाला बळी ना पडता पतसंस्था व मल्टीस्टेट यांचे कर्ज वाटप, राखीव निधी, तरलता निधी, ऑडिट वर्ग, थकबाकी, एन.पी.ए., शाखा विस्तार, कर्मचारी भरती, मागील सलग तीन वर्षे लाभांश वाटप याचा अभ्यास करून सहकार कायद्यानुसार काम करणाऱ्या विश्वासार्ह पतसंस्थेची निवड करावी….

बचत ठेव योजना

दैनंदिन/ पिग्मी ठेव खाते

सुपर बचत ठेव खाते

रिकारींग ठेव योजना
बचत ठेव योजना
पैशांची बचत करणे ही एक चांगली सवय आहे. ज्यामुळे आपले जीवन सुधारायला मदत होते, तसेच दैनंदिन व्यवहारासाठी लागणारा पैसा बचत खात्यात सुरक्षित राहतो. अनपेक्षित खर्चासाठी मी काही पैसे साठवले किंवा बचत केले आहेत, हे समाधान कुणालाही आनंददायीच असतं.त्यातूनच आपण आपली काही स्वप्नं पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो.
बचत खात्याद्वारे जशी गरज असेल तसे पैशाचा भरणा किंवा काढण्याची सुविधा बचत खात्यात असते.
तर वाट कसली बघताय ?
- आजच संस्थेत स्वतःचे नवीन खाते उघडून परिपूर्ण बँकिग व तत्पर सेवेचा अनुभव घ्या….!
- बचत खाते उघडताना कमीतकमी रु 200/- शिल्लक रक्कम असणे आवश्यक
- बचत खाते संस्थेच्या मोबाइल बँकिंग सुविधेशी जोडलेले आहे.

दैनंदिन/ पिग्मी ठेव खाते
दैनंदिन कमाई रोज हातात येत असली तरी महिन्याच्या शेवटी काहीच शिल्लक पडत नाही. अशा परिस्थितीत शालिवाहन पतसंस्था तुमच्यासाठी घेऊन आली आहे दैनंदिन ठेव योजना…!
आमचा अधिकृत प्रतिनिधी रोजच्या रोज तुमच्या कडे येऊन तुम्हाला बचत करता येतील इतके पैसे घेऊन जातो व तुमच्या पिग्मी खात्यास भरणा करतो. यातून आजच्या छोट्याश्या गुंतवणुकीतून भविष्याची मोठी बचत तयार होते. काही वर्षांनंतर ही छोटीशी गुंतवणूक आकर्षक व्याजदरासह एक मोठी रक्कम तयार झालेली असेल, जी करेल तुमचे स्वप्न पूर्ण.
ही योजना मुले, गृहिणी, व्यावसायिक, पगारदार मंडळी, दुकानदार, छोटे व्यापारी आणि व्यावसायिक यांच्यासाठी प्रचंड लाभदायी आहे.
छोट्या छोट्या बचतीतून पूर्ण करा स्वप्नांचा महासागर!

सुपर बचत ठेव खाते
(वकील ,डॉक्टर्स व व्यावसायिकांकरिता)
सुपर सेविंग खाते हे दैनंदिन वापरसाठीचे खातेआहे. सदर खात्यास मासिक ५% द. सा. द. शे. व्याज दिले जाणारी महाराष्ट्रतील नामांकित पतसंस्था म्हणजे शालिवाहन पतसंस्था…..!
वकील ,डॉक्टर्स व व्यावसायिकांकरिता हे खाते असून आवश्यक पेमेंट्स आणि पैसे काढण्यासाठी तरलता निधी उपलब्ध ठेवण्यासाठी ते खाते आहे.
- सुपर बचत खाते उघडताना कमीतकमी रु ५00/- शिल्लक रक्कम असणे आवश्यक
- सुपर बचत खाते संस्थेच्या मोबाइल बँकिंग सुविधेशी जोडलेले आहे.
- सदर खात्यास मासिक ५% द.सा.द.शे. व्याज दिले जाते

रिकारींग (आवर्ती ) ठेव योजना – 9.50%
अनेकदा घरी येणारं उत्पन्न कुटूंबाच्या छोट्या-छोट्या गरजा पुरवण्यातच खर्च होऊन जातं, आणि नेमक्या गरजेच्या वेळी खात्यात काहीच शिल्लक राहत नाही. म्हणून एका शिस्तबद्ध पद्धतीने बचत करायला हवी, आणि त्यासाठीच आवर्ती ठेवी खातं ही एक नियोजित आणि सुलभ मार्ग आहे.
जिथे व्यक्ती दर आठवड्याला किंवा दर महिन्याला काही ठराविक रक्कम ठराविक काळासाठी आवर्ती ठेव खात्यात जमा करतो. आणि ठराविक कालावधीनंतर आकर्षक व्याजासह एकूण रक्कम खातेदारास परत मिळते.
उद्याच्या मोठ्या गरजा आणि स्वप्न पूर्ण करण्यासाठी शालिवाहन पतसंस्थेची आवर्ती ठेव योजना लोकांसाठी एक लोकप्रिय पर्याय ठरत आहे………..


दामदुप्पट ठेव योजना
मोठी स्वप्न पूर्ण करण्यासाठी मिळकतही हवी मोठी ! आपल्या स्वप्नांच्या दिशेनं पहिलं पाऊल उचला ………………………
आजच्या काळात आपली गुंतवणूक दुप्पट व्हावी असं प्रत्येकाला वाटतं, पण ही गुंतवणूक विश्वसनीय ठिकाणीच व्हायला हवी, जेणेकरून ठराविक काळानंतर तुमची रक्कम होईल दुप्पट आणि तुमचं हवं ते स्वप्नही होईल पूर्ण आणि तेही अपेक्षेपेक्षा लवकर !
असंख्य ग्राहकांचा विश्वास व पैसे दुप्पट करण्याचा उत्तम आणि सुरक्षित पर्याय – म्हणजेच शालिवाहन पतसंस्थेची दाम दुप्पट ठेव योजना.
आमच्या दाम दुप्पट योजनेंतर्गत १२० महिन्यात तुम्ही गुंतवलेली रक्कम तुम्हाला दुप्पट होऊन मिळते. दाम दुप्पट योजनेबाबत अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा…..
आजच निर्णय घ्या व आपल्या स्वप्नांच्या दिशेनं पहिलं पाऊल उचला.. !

मुदत ठेव खाते
व्यवसाय असो अथवा नोकरी, अनेकदा पैसे येतात आणि मुठीतल्या वाळूसारखे हातातून कधी निघून जातात तेच कळत नाही. परिणामी, जमवलेली बचतही अशीच निघून जाते. म्हणूनच कष्टाने पै-पै जमवून केलेली बचत योग्य वेळी, योग्य ठिकाणी गुंतवणे गरजेचं आहे; जिथे मिळेल सुरक्षिततेची हमी आणि आकर्षक परतावा.
मुदत ठेवी मध्ये एक ठराविक रक्कम निश्चित कालावधीसाठी जमा केली जाते, ज्यावर निश्चित व्याजदर दिला जातो. हा व्याजदर गुंतवणुकीवर निश्चित परतावा मिळण्याचे आश्वासन देतो मुदत ठेवी मध्ये कालावधी आणि व्याजदराच्या परतफेडीचे विविध पर्याय उपलब्ध असतात म्हणजेच बचत ठराविक कालावधीसाठी मुदत ठेव म्हणून ठेवणे एक उत्तम आणि सुरक्षित पर्याय आहे!
विशेष म्हणजे ज्येष्ठ नागरिकांसाठी या योजनेत अधिकत्तम व्याज मिळते. म्हणजे शालिवाहन पतसंस्थेमध्ये गुंतवणुकचं होऊ शकते कमाईचे साधन…


मासिक (पेन्शन) ठेव खाते
‘थेंबे–थेंबे तळे साचे’, जसे आज लावलेले झाड भविष्यात फळांसह सावलीही देते. आपणही आपल्या भविष्यातील आरामदायी जीवनासाठीच बीज आजच पेरायला हव, जेणेकरून वृद्धापकाळात निश्चिंत जीवनाचा आनंद घेता येईल. यासाठीच शालिवाहन पतसंस्था घेऊन आली आहे मासिक ठेव योजना….!
एका ठराविक वयानंतर आपली सर्व कामं, जबाबदाऱ्या आणि धकाधकीच्या जीवनाला बाजूला सारून आपल जीवन हे शांत, सुखी व समाधानी असल पाहिजे. या काळात जीवनात आर्थिक अडचणींमुळे व्यत्यय येऊ नये यासाठी आताच तरतूद करा. शालिवाहन मासिक ठेव योजनेत दरमहा थोडी-थोडी गुंतवणूक करा आणि निवृत्तीनंतर आनंद घ्या आनंददायी व समाधानी जीवनाचा.
आपल्या मासिक ठेव योजनेचा परतावा दरमहा जमा होईल सरळ तुमच्या खात्यात.
निवृत्तीनंतर आनंद घ्या आनंददायी समाधानी जीवनाचा….!


If need any info About Deposit please contact us!

Inquiry Form



Saving Account
A Business Friend Loan is an informal loan agreement between friends, where one lends money to the other to support a business venture. This type of loan typically has flexible terms, such as low or no interest, extended repayment periods, and minimal or no formal documentation. While it’s rooted in trust and goodwill, it’s important to establish clear repayment terms to avoid potential strain on the friendship.
