पैठण! इतिहास व संस्कृतीच्या पाऊलखुणा जतन करणार टुमदार शहर. ऐतिहासिक काळात प्रतिष्ठान या नावाने ओळखले जाणारे, सातवाहन राजवंशाचे आणि गौतमीपुत्र शालिवाहन राजाचे राजधानीचे ठिकाण. शालिवाहन हा फार शूर व पराक्रमी राजा होऊन गेला. हा बालपणी एका वृद्ध कुंभाराच्या संपर्कात आला व त्याने तेथेच सुंदर सुंदर मातीच्या मूर्ती घडवण्याची कला अवगत केली. 'शतकरणी'(शालिवाहन) आपल्या सवंगड्यांसोबत खेळताना अनेक मातीचे हत्ती, घोडे, सैन्य, शस्त्र अशी खेळणी स्वतः तयार करून खेळत असे.आज आपण शालिवाहन शके १९३७ मध्ये वावरत असताना शालीवाहनच्या प्रतिष्ठान नगरी(पैठण) च्या पावनभूमीत शालिवाहनच्या नावाने शालिवाहन नगरी सहकारी पतसंस्था उदयास आली.
‘ ग्राहकांचा विश्वास हेच आपले खरं भांडवल ‘, अशी शालिवाहन नागरी सहकारी पतसंस्थेची नेहमीच धारणा राहिली आहे . अडचणीच्या प्रसंगी सभासदांना आर्थिक आधार देतानाच , विविध लाभदायी योजनांतून ग्राहकांचं हित जपण्याचं कार्य देखील संस्था नेटाने करत आहे.1997 पासून सुरू असलेली ही व्रतस्थ वाटचाल , आता एका नव्या वळणावर येऊन ठेपलीय. डिजिटल तंत्रज्ञानाचा अंगीकार करून आपली संस्था अत्याधुनिक सेवा –सुविधा प्रदान करण्यात औरंगाबाद जिल्ह्यात अग्रेसर आहे . याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो. सातत्याने उत्तम कामगिरी बजावून वेगाने शाखा विस्तार करताना , संस्थेने 100 कोटीचे लक्ष निश्चित केले आहे. अभिमानाची बाब म्हणजे संस्थेचे व्यवस्थापन ISO 9001:2015 गुणवत्ता मानांकन प्राप्त करणारी पहिली पतसंस्था असून लेखापरीक्षण मध्ये मागील 12 वर्षापासून ' अ ' स्टार वर्ग आहे. सामाजिक जाणिवेतून साकारलेल्या शालिवाहन पतसंस्थेकडून विविध प्रकारचे सामाजिक उपक्रम सातत्याने राबवले जातात. यामध्ये गोदावरी स्वछता अभियान , आरोग्य शिबीर , रकतदान , नेत्रतापसणी , पाणी बचतीचे महत्त्व , रुग्णवाहिका सेवा , स्वर्ग रथ , मोफत मोतीबिंदू क्षक्ष्त्राक्रिया , योग शिबीर , मोफत कृत्रिम हातपाय(जयपूर फुट) वितरण अशा विविध उपक्रमांत संस्थेचा मोठा सहभाग असतो. याचबरोबर संस्थेच्या वतीने प्रतिष्ठान गोदा गौरव पुरस्कार दरवर्षी दिला जातो. प्रत्येकाची गरज , आर्थिक नियोजन आणि गुंतवणुकी मागची भूमिका भिन्न असते , या जाणिवेने कष्टकरी व्यक्तिपासून मध्यमवर्गीय नोकरदारापर्यंत , मोठा व्यापारी ते उद्योजकांनपर्यंत सर्वांसाठी आकर्षक व्याजदरच्या उपयुक्त ठेव योजना व त्यांच्या स्वप्नपूर्तीचे उद्दिष्ट लक्षात घेता किमान कागदोपत्री पूर्तता व गतिमान प्रक्रिया बरोबर सुलभ अर्थसहाय्य देणार्या विविध कर्ज योजना शालिवाहन कडे आहे.
नाथ प्लाझा , बस स्टँड जवळ, पैठण
phone:-(०२४३१)२९९२५६
मो. नं:-७७७४०५३९७०
महाराष्ट्र बँक समोर , बीड हायवे, पाचोड
phone:-(०२४३२)२९९१५६
मो. नं:-७७७४०५३९७१
टेकडी हॉस्पिटलजवळ , चितेगाव
phone:-(०२४३१ )२५११५६ मो. नं:-८८८८८६८७३६
दिशा संकुल, रिलायन्स मॉलजवळ , गारखेडा
phone:-(०२४० )२४४११५६ मो. नं:-७८८८००८५०५
हॉटेल वृंदावणजवळ ,वाळूज
phone:-(०२४० )२५५११५६
मो. नं:-७८८८००८५०२
गणपती चौक, गंगापूर
phone:-(०२४३३)२२११५६
मो. नं:-७८८८००८५०८
स्टेशन रोड , वैजापूर
phone:-(०२४३६)२२५१५६
मो. नं:-९१३००३८७६३
बस स्टँड जवळ , पाथर्डी
phone:-(०२४२८)२९७१५६
मो. नं:-९१४६०३८७०८
पाथर्डी रोड, आंबेडकर चौक, शेवगाव
phone:-(०२४२९)२९७०८५
मो. नं:-७७७४०५३९७४
महावीर चौक, ता, अंबड, अंबड
phone:-(०२४८३)२९९२५६
मो. नं:-८९५६८४७६१०
चाळीसगाव रोड, शिवाजी कॉलेज गेट, कन्नड
phone:-(०२४३५)२
मो. नं:-८९५६९६७१२५
जळगाव रोड, आंबेडकर चौक, सिल्लोड
phone:-(०२४३०)२२३१५६
मो. नं:-८९५६८४७६१३
सिनेप्लेक्स जवळ,ता. येवला, येवला
phone:-(०२५५९)२९९१५६
मो. नं:-८९५६९४७६१६